News Flash

कन्टेन्मेंट झोन घोषित केल्याने भाजपाच्या नगरसेविकेला मारहाण

शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भानापेठ वॉर्ड करोना प्रतिबंधक क्षेत्र म्हणून बंद केला म्हणून दुर्गा वैरागडे या महिलेने भाजपाच्या नगरसेविका शितल कुळमेथे यांना मारहाण केली. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात नगरसेविका कुळमेथे यांनी तक्रार दिली आहे.

भानापेठ येथे एका वृद्ध महिलेला करोनाची लागण झाली. त्यामुळे प्रशासन व महापालिकेने हा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला. या परिसरातील नागरिकांना फिरण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान, या वॉर्डाच्या नगरसेविका शितल कुळमेथे या पाहणीसाठी गेल्या असता दुर्गा वैरागडे नामक महिलेने कोणत्या कारणावरून परिसर सील केला असा प्रश्न विचारत वाद घातला.

दरम्यान, या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. नगरसेविका शितल कुळमेथे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 9:15 pm

Web Title: bjp lady corporator beaten for declaring containment in chandrapur zone aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सातारा : करोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्याला घरी येण्यापासून रोखणाऱ्यांविरोधात होणार कारवाई
2 पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही – सारंग पाटील
3 महाराष्ट्रात ७ हजार ९२४ नवे करोना रुग्ण, २२७ मृत्यूंची नोंद
Just Now!
X