जितेंद्र पाटील

लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या दणदणीत विजयामुळे जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रचारादरम्यान उद्भवलेल्या हाणामारीच्या प्रसंगानंतरही भाजपने घवघवीत यश मिळविल्याने प्रतिस्पर्धी कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने पाहिलेले विजयाचे स्वप्न पार धुळीस मिळाले.

जिल्ह्याच्या राजकारणात काही वर्षांपासून शिवसेनेचे नेते सुरेश जैन तसेच भाजपचे नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांचीच चलती राहिली आहे. सुरेश जैनांची घट्ट पकड होती, तोपर्यंत खडसे किंवा महाजन यांना जळगाव शहराच्या राजकारणात हस्तक्षेप करणे शक्य झाले नव्हते. किंबहुना जैनांमुळे दोघांना जळगावच्या वेशीबाहेरच ताटकळावे लागले होते. घरकूल घोटाळ्यातील आरोपांमुळे सुरेश जैन तुरूंगात गेल्यावर खडसे-महाजन यांनी जळगाव शहरावर ताबा मिळविण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या. विधानसभेच्या निवडणुकीत जैनांच्या गैरहजेरीत भाजपने सेनेच्या बालेकिल्लय़ास सुरूंग लावत सुरेश भोळे यांना निवडून आणले. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री पदाची अपेक्षा बाळगून असलेल्या एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणून गिरीश महाजन यांचे वर्चस्व वाढले. कधीकाळी हातात घालून फिरणारे खडसे आणि महाजन यांच्यात वर्चस्वावरून कूरघोडीचे राजकारण सुरू असतांना त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीतही उमटले. उमेदवारी देण्यावरूनच भाजपमध्ये वादळ निर्माण झाले.

ए. टी. पाटील या विद्यमान खासदारास उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर खडसे, महाजन यांच्यातील कूरघोडीच्या राजकारणावर मात करीत विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांनी भाजपची अधिकृत उमेदवारी मिळवली. महाजन यांनी शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्ठींना चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यास भाग पाडले. भाजपमधील असंतोषाची खदखद अमळनेरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात बाहेर पडली. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी त्यांच्या पत्नी स्मिता वाघ यांच्याबद्दल अपशब्द काढणारे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावर मारहाण केली. भाजपमधील असंतोष आणि त्यामुळे मतदारसंघात निर्माण झालेली नकारात्मक भावना लक्षात घेता प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने काहीही करून यंदा ही जागा जिंकायची, या जिद्दीने प्रयत्न केले. प्रत्यक्षात निवडणूक निकालात भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी जादूची कांडी फिरवावी त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या विरोधात सुमारे चार लाख ११ हजाराचे मताधिक्य घेऊन विजय मिळवला. उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले ए. टी. पाटील यांच्या पारोळा तालुक्यात तसेच तिकीट कापल्यामुळे दुखावल्या गेलेल्या स्मिता वाघ यांच्या अमळनेर तालुक्यातही उन्मेष पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले. देवकरांचा प्रभाव असलेल्या जळगाव ग्रामीण तसेच जळगाव शहर मतदारसंघातही पाटील यांना चांगली मते मिळाली.

रावेर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना यंदा दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. खासदारकीच्या माध्यमातून पाच वर्षांंच्या कालावधीत केलेल्या भरीव विकासकामांच्या बळावर रक्षा यांनी संपूर्ण मतदारसंघात आपला प्रभाव निर्माण केला होता. मात्र, डॉ. उल्हास पाटील यांना महाआघाडीने उमेदवारी दिल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंनी कधी नव्हे, ते यंदा एकजुटीचे चांगले प्रदर्शन केले. प्रचारासाठी मिळालेल्या कमी दिवसांत संपूर्ण मतदारसंघात महाआघाडीची ध्येय धोरणे पोहचविण्याचे कार्य एकदिलाने पार पाडले. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने नितीन कांडेलकर यांच्या रूपाने आणखी एक आव्हान भाजप उमेदवारासमोर उभे केले होते.

चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार करणार नसल्याचा दम भरल्याने रक्षा खडसे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. खुद्द एकनाथ खडसे यांना त्यामुळे प्रकृती बरी नसतांनाही सुनेसाठी प्रचारसभा घ्याव्या लागल्या. मतदारसंघातील चुरशीची स्थिती लक्षात घेता रक्षा यांच्या गेल्यावेळी मिळालेल्या मताधिक्यात घट होईल, असा अंदाज निकालाआधी वर्तविला जात होता. प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी रक्षा यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखली.

डॉ. उल्हास पाटील यांच्या विरोधात त्यांनी तब्बल तीन लाख ३५ हजार मतांची आघाडी घेतली. मतदारसंघातील शिवसेनेची नाराजी किंवा वंचित बहुजन आघाडीची मत विभागणी रक्षा यांच्या मताधिक्याला रोखू शकली नाही.

डॉ. उल्हास पाटील यांना महाआघाडीने उमेदवारी दिल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंनी कधी नव्हे, ते यंदा एकजुटीचे चांगले प्रदर्शन केले. प्रचारासाठी मिळालेल्या कमी दिवसांत संपूर्ण मतदारसंघात महाआघाडीची ध्येय धोरणे पोहचविण्याचे कार्य एकदिलाने पार पाडले. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने नितीन कांडेलकर यांच्या रूपाने आणखी एक आव्हान भाजप उमेदवारासमोर उभे केले होते.

भाजपमधील असंतोष आणि त्यामुळे मतदारसंघात निर्माण झालेली नकारात्मक भावना लक्षात घेता प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने काहीही करून यंदा ही जागा जिंकायची, या जिद्दीने प्रयत्न केले.

सुरेश जैनांची घट्ट पकड होती, तोपर्यंत खडसे किंवा महाजन यांना जळगाव शहराच्या राजकारणात हस्तक्षेप करणे शक्य झाले नव्हते. किंबहुना जैनांमुळे दोघांना जळगावच्या वेशीबाहेरच ताटकळावे लागले होते. घरकूल घोटाळ्यातील आरोपांमुळे सुरेश जैन तुरूंगात गेल्यावर खडसे-महाजन यांनी जळगाव शहरावर ताबा मिळविण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या. विधानसभेच्या निवडणुकीत जैनांच्या गैरहजेरीत भाजपने सेनेच्या बालेकिल्लय़ास सुरूंग लावत सुरेश भोळे यांना निवडून आणले.