News Flash

“सेनेला मुख्यमंत्रिपदाचं गाजर देऊन पवारांनी तिघाडी सरकार बोकांडी बसवलं”

यावेळी त्यांनी राज्य सरकारवही टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर बोलावण्यात आलेल्या पहिल्याच अधिवेशनात विरोधीपक्षात असलेल्या भाजपानं सरकारला धारेवर धरण्यास सुरूवात केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना अहम नडला असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. यावरून भातखळकर यांनी टीका केली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं गाजर दाखल शरद पवार यांनी त्यांना काँग्रेससोबत जोडलं. तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले आणि महायुतीला मिळालेल्या जनादेशाचा अपमान केला, असं ते म्हणाले

अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांना अहम् नडला असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. वस्तूस्थिती ही की शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून पवारांनी त्यांना काँग्रेससोबत जोडले. तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले आणि महायुतीला मिळालेल्या जनादेशाचा अपमान केला, असं भातखळकर म्हणाले. तसंच १०५ जागा मिळवणाऱ्या फडणवीसांना जनतेने नाकारलं, इति शरद पवार. म्हणजे ५०-५५ जागा मिळवणाऱ्या तुमच्या पक्षाला लाथाडलं असंच म्हणावं लागेल, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोबाबत घेतलेल्या निर्णयावरूनही त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मेट्रोसारखे जनोपयोगी प्रकल्प बंद करून मत्सालयाचा घाट घालणे म्हणजे तिघाडी सरकारची निव्वळ बौद्धिक दिवाळखोरी आहे. वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे बंद करा, असं ते यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 11:54 am

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize ncp chief sharad pawar over various issues jud 87
Next Stories
1 शिवाजी विद्यापीठाचं नाव बदला; छत्रपती संभाजीराजे यांची मागणी
2 ठाकरे सरकारचं आज खातेवाटप ? सहा मंत्र्यांची लागू शकते वर्णी
3 अजित पवार इतका टोकाचा निर्णय घेतील असं वाटलं नव्हतं – शरद पवार
Just Now!
X