News Flash

संजय राऊत यांचं घर सिल्व्हर ओकच्या गॅलरीत; अतुल भातखळकरांचा टोला

“विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय आणि घर राजभवनाच्या दारात आहे का?,” असा सवाल राऊत यांनी केला होता.

राज्यात करोनाचं संकट उद्भवलेलं असताना पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड घडलं. या हत्याकांडावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. पालघरमधील घटनेवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “विरोधी पक्षाचं अधःपतन महाराष्ट्रात आतापर्यंत कधी झालं नव्हतं,” असं म्हणत “विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय आणि घर राजभवनाच्या दारात आहे का?,” असा सवाल राऊत यांनी फडणवीस यांना केला आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांचं घर सिल्व्हर ओकच्या गॅलरीत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

“विरोधी पक्षनेत्याचं घर राजभवनाच्या दारात आहे का,असे संजय राऊत विचारत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे घर नक्कीच नाही. त्यांचे मात्र ‘सिल्वर ओक’ च्या गॅलरीत आहे हे जगाला ठाऊक आहे,” असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. त्यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्न आणि त्यावरून सुरू असलेलं राजकारण यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.

आणखी वाचा- तुम्ही सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सरकारच्या नावानं झांजा वाजवल्यावर हे होणारच : राऊतांचे विरोधकांवर टीकेचे बाण

काय म्हणाले राऊत?
“विरोधी पक्षनेत्यानं मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून करोनाची लढाई लढण्यामध्ये सरकारला आणि राज्याला मदत केली पाहिजे. पण, आमचा संपूर्ण विरोधी पक्ष २४ तास राज भवनाच्या दारात उभा आहे. विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय किंवा घर काय राज भवनाच्या दारात आहे का? राज भवनात जाऊन एखादी तक्रार करू शकता. विरोधी पक्षनेत्याचे आणि मुख्यमंत्र्यांचे उत्तम संबंध आहेत, असं मी मानतो. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोन करून थेट बोलायला हवं. त्यात राज्याचं हित आहे. तुम्ही राज्य अस्थिर करायला निघाला आहात. जे राज्य तुम्ही पाच वर्ष चालवलं. तो महाराष्ट्र बदनाम करून तुम्हाला काय मिळवायचं आहे? असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 3:16 pm

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena mp sanjay raut silver oak sharad pawar jud 87
Next Stories
1 “महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा”; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला
2 Coronavirus : व्हेंटीलेशन प्रक्रियेबाबत प्रशिक्षणासाठी वर्धेत अद्यावत केंद्र
3 “महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र सुरु करण्यासाठी…”; अर्थव्यवस्थेसंदर्भात राज ठाकरेंचे उद्धव यांना पत्र
Just Now!
X