News Flash

सोनारानंच कान टोचले हे बरं झालं; भगवा फडकवण्यावरील पवारांच्या प्रतिक्रियेवरून भाजपाचा टोला

शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय, पवारांनी दिली होती प्रतिक्रिया

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला होता. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत गेले ३०-३५ वर्ष आपण हे एकत असल्याचं म्हटलं होतं. “सोनारानंच कान टोचले हे बरं झालं,” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

“शिवसेनेचा भगवा फडकवा, हे ३० वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार… हा घ्या घरचा आहेर.. सोनाराने कान टोचले ते बरं झालं,” असं म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले होते पवार?

“कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच सांगत असतो. त्यात काही नवीन नाही. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे. त्याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही,” असं शरद पवार म्हणाले होते. “स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायच्या की स्वतंत्र हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. जो काही निर्णय असेल तो एकत्रितपणे घेतला जाईल,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. “आपल्याला राज्यात स्थिरता हवी आहे. राज्य नीट चाललं पाहिजे. भाजपाला बाजूला करण्यासाठी सगळे एकत्र आल्याने लोकांना चांगली फळं मिळालेली दिसत आहेत. याच पद्धतीनं राज्य करा,” असा सल्लाही पवारांनी दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 1:14 pm

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena uddhav thackeray ncp leader sharad pawar statement on bhagwa zenda jud 87
Next Stories
1 यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द
2 “वेळ पडली तर उद्धव ठाकरेंनाही…,” राज्यपाल भेटीनंतर राज ठाकरे आक्रमक
3 कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही; राज ठाकरेंचा टोला
Just Now!
X