News Flash

“शिवसेनाप्रमुखांना जयंतीदिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना…”

भाजपाच्या अतुल भातखळकरांचा शिवसेना, 'सामना'ला टोला

पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास नकार दिला. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा सारा प्रकार घडला. यावरून शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला. बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेतेमंडळींना फोडून भाजपा निवडणूक लढताना दिसत आहे अशी टीका करण्यात आली. तसेच टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदी असाही उल्लेख करण्यात आला. या मुद्द्यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला आणि ‘सामना’ला टोला लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वीच जयंती साजरी करण्यात आली. मुंबईत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले नाही असा आरोप करत अतुल भातखळकरांनी काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला. “सामना’ने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे, त्याचा विचार करावा. शिवसेनाप्रमुखांना जयंतीदिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर…”, अशी बोचरी टीका भातखळकरांनी केली आहे.

नक्की काय लिहिलं आहे ‘सामना’मध्ये…

“प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच, प. बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढला आहे. टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही काल कोलकात्यात येऊन गेले. निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे. हिंदुस्थानी लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. कौल हा स्वीकारावाच लागतो. पण कौल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात, ते असह्य ठरतात”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 6:37 pm

Web Title: bjp leader atul bhatkhalkar slams uddhav thackeray shivsena sanjay raut rahul gandhi balasaheb thackeray vjb 91
Next Stories
1 “शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची गरज नव्हती, हा केवळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न”; आठवलेंचा हल्लाबोल
2 प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अध्यासन केंद्र सुरू करणार – उदय सामंत
3 ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक
Just Now!
X