07 July 2020

News Flash

इंदुरीकर महाराजांनी ते विधान करायला नको होतं – भाजपा

चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका केली स्पष्ट

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून या वक्तव्यावरून वेगवेगळे मतं मांडली जात आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला होता. ओझर येथे झालेल्या किर्तनात “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असं इंदुरीकर महाराजांनी म्हणाले होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला होता. या आरोपानंतर महाराष्ट्रात वाद निर्माण झाला.

आणखी वाचा – इंदुरीकर महाराजांकडून आता शिक्षकांची खिल्ली, शिक्षक संघटना नाराज

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, “इंदुरीकर महाराजांची कीर्तनं जनप्रबोधनासाठी असतात. मात्र, इंदुरीकरांनी ‘ते’ विधान करायला नको होतं. इंदुरीकर महाराजांनी केलेलं ते विधान चुकीचंच आहे. त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण, भाजपा त्यांच्या पाठिंशी आहे. एका वाक्यानं व्यक्ती खराब होत नाही. एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका,” असं आवाहन पाटील यांनी केलं.

आणखी वाचा – इंदुरीकर महाराजांवर सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या …

हे सरकार आम्ही पाडणार नाही

राज्यातील महाविकास आघाडी सरकारविषयी पाटील म्हणाले,”राष्ट्रवादीेचे नेते वारंवार खोटं बोलत आहेत. आम्ही हे सरकार पाडणार नाही. हे सरकार आपोआप पडेल, असा दावा त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावं असं आव्हान भाजपाला दिलं होतं. त्याला पाटील यांनी उत्तर दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 12:55 pm

Web Title: bjp leader chandrakant patil express his opinion about indurikar maharaj statement bmh 90
Next Stories
1 “मोदी सगळ्यात मोठे विकास पुरूष; त्यांच्या आधीही कुणी विकास केला नाही, नंतरही करणार नाही”
2 केंद्राने पैसे थकविल्याने राज्यापुढे आर्थिक पेच – खासदार सुळे
3 अडीच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
Just Now!
X