26 November 2020

News Flash

“नाथाभाऊ कुठे जाणार…,” खडसेंच्या नाराजीवर चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया

शरद पवारांनी खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरील चर्चा अद्यापही सुरु आहेत. शरद पवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पुण्यात एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

खडसे नाराज असल्याने कार्यक्रमांना अनुपस्थित असतात असं विचारण्यात आलं असता प्रदेश कार्यकारिणीला ते दिवसभर उपस्थित होते. संध्याकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतरच गेले अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

खडसे यांना राष्ट्रवादीचा हिरवा कंदील
“विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येते. एक पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे वाटत असेल आणि त्यातून एका विचाराकडे माणूस जातो. जेथे नोंद घेतली जाते तेथे जावे का, असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच आहे,” असं म्हणत शरद पवार यांनी खडसे प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:46 pm

Web Title: bjp leader chandrakant patil on eknath khadse svk 88 sgy 87
Next Stories
1 दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती; रोहित पवारांनी मोदी सरकारला मदतीवरून सुनावलं
2 ठाकरे सरकारकडून जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 कर्ज काढतोय म्हणजे पाप करत नाही, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा
Just Now!
X