News Flash

“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसारखा दौरा करु नये”

"उद्धव ठाकरेंनी प्रवास सुरु केला हा चेष्ठा करण्याचा विषय नाही"

राज्यात परतीच्या पावसाने बसलेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरचा दौरा करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून ते पूर्ण होऊ न संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत दिली जाईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना त्यांनी फडणवीसांरखा दौरा करुन उपयोग नाही असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत चंद्रकांत पाटील –
“मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमधील काही गावांचा दौरा केला. असा धावता प्रवास करुन काही होणार नाही. खूप ठिकाणी जाऊन लोकांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री व्हायचं असतं कारण जे वाटतं ते तिथल्या तिथे निर्णय जाहीर करुन प्रशासनाकडून त्यांची अमलबजावणी करता आली पाहिजे. काल नाही, पण किमान आज काहीतरी मदत जाहीर करायला हवी होती जेणेकरुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “बाकीच्यांनी प्रवासच करायचा असतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास करायचा, अश्रू पुसायचे, तुमच्या मागण्या मांडतो असं सांगायचं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासारखा प्रवास करुन काही उपयोग नाही. त्या प्रवासात काही ठोस घोषणा केल्या पाहिजेत. पुन्हा अतिवृष्टी होईल, पाहतो असं बोलायचं नसतं,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. प्रवास सुरु केला हा चेष्ठा करण्याचा विषय नाही, पण त्यांनी ठोस निर्णयही घ्यावेत असंही ते म्हणाले.

“शरद पवारांबद्दल माझ्या मनात नेहमी आदर आहे. राज्यात मुख्यमंत्री असताना, केंद्रात असताना कितीतरी गोष्टींना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. पण त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते याचं वाईट वाटतं. उद्धव ठाकरेंना घरी थांबा असं पवारसाहेब मनपासून बोलले नसतील. या वयात मी बाहेर पडलो तुम्हीही बाहे पडा असं म्हणत असतील,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.

फडणवीसांनी बारामतीमधून प्रवास सुरु करुन पवार कुटुंबाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांचा प्रवास शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी आहे. शेतकऱ्यांची मागणी सरकारी दरबारी मांडण्यासाठी आहे. बिहारमध्ये मोदींच्या १२ सभा होणार असतानाही विनंती करुन त्यांनी ८५० किमी प्रवास केला. त्यामुळे हा कोडींत पकडण्याचा नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 1:30 pm

Web Title: bjp leader chandrakant patil on maharashtra government cm uddhav thackeray devendra fadanvis svk 88 sgy 87
Next Stories
1 चोराला पकडण्यासाठी पिंपरी पोलिसांनी लढवली शक्कल, तरुणीच्या नावे फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि…
2 महापालिकेच्या मालमत्ता विक्रीला
3 अभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर
Just Now!
X