तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही.. करोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे.

लॉकडाउन की अनलॉक अजून कळत नाही. मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. लॉकडाउनमध्ये जेवढे कडक निर्बंध नव्हते तेवढे अनलॉकमध्ये घालून ठेवले आहेत लोकांनी नेमकं काय करायचं? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांन विचारला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे.

आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेतले जात आहेत की त्यावर काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस वैतागला आहे. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागली आहे. तुमच्यात मतभेद आहेत तर आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही” असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.

” मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीही संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दोन तास मागितले असते, पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतो. ”