News Flash

“हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार!” देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर घणाघात!

"महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना ठाकरे सरकारने आज विजेचा शॉक दिला आहे"

संग्रहित छायाचित्र

“महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात लबाड सरकार हे आज आम्हाला पहायला मिळालं. ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून लिहील जाईल. याचं कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राणा भीमदेवी थाटात घोषित करायचं की, शेतकऱ्यांचे जे काही विजेचे मीटर आहेत कनेक्शन आहेत ते कापण्यावर आम्ही स्थगिती दिली आहे. आणि शेवटच्या दिवशी ती स्थगिती उठवायची. ही सर्वात मोठी लबाडी आहे. ही स्थगिती उठवताना दिली गेलेली कारणे पूर्णपणे चूकीची आहेत. ” असा आरोप विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आज केला.

ते पुढे म्हणाले “महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना ठाकरे सरकारने आज विजेचा शॉक दिला आहे आणि म्हणून हे लबाड सरकार आहे. ज्या शेलकऱ्याला बांधावर जावून कर्जमुक्त करतो हे सांगितलं होतं. २५००० रूपये देतो म्हणुन आश्वासन दिलं होतं. त्या शेतकऱ्याला एक नवा पैसा दिला नाही. २ लाखाच्या वरच्या शेतकऱ्याला कर्जमाफी नाही आणि नियमित वीज बील भरणाऱ्या शेतकऱ्याला तर आज दादांनी स्वत: कबूल केलं की आम्ही बोललो होतो पण आता कर्जमुक्ती देवू शकत नाही.”

“म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्याची पुर्ण फसवणुक या सरकारने केली आहे. पीकविमाच्या संदर्भात तर अक्षरश: असत्य माहिती सरकारने दिली कारण पीक विम्याचे निकष ठरवणे आणि त्याप्रमाणे टेंडर काढणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.” अशी टीका पण त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 7:57 pm

Web Title: bjp leader devendra fadanvis slams maharashtra government sbi 84
Next Stories
1 साताऱ्यातील वृद्धाश्रमातील २३ ज्येष्ठ नागरिकांना करोनाची बाधा
2 रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?; नाना पटोलेंचा सवाल
3 अंबानी प्रकरण: ‘ती’ गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Just Now!
X