News Flash

“राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

वाचा, नक्की कोणत्या प्रकरणावरून केलं भाष्य...

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही महिन्यात करोना आणि वादळी परिस्थितीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झोडपून काढले. संपूर्ण राज्यात वादळामुळे भरपूर नुकसान झाले. या नुकसानाची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल झाले तेव्हा त्यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलेल्या धनादेशांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

“सत्तेवर असूनही तुतारीची पिपाणी झालेल्यांनी…”; भाजपा नेत्याची शिवसेनेवर बोचरी टीका

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सोलापूरला पहाणी दौऱ्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या हस्ते तीन हजार रूपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती जेव्हा अशा ठिकाणी जाते तेव्हा त्यांच्या हस्ते किती मदत द्यावी याचा काहीतरी राजशिष्टाचार ठरवण्यात आला पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या तीन-तीन हजारांचे चेक नुकसान भरपाई म्हणून देणं योग्य नाही. अजितदादा, मुख्यमंत्र्यांच्या हाताने केवळ तीन हजारांचे चेक वाटप केलं जाणं बरोबर आहे का? अशा प्रकारची मदत देणं म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ याच म्हणीप्रमाणे आहे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

चर्चा न करता कामकाज उरकणं हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्रीपदाच्या व्यक्तीच्या हस्ते केवळ तीन हजारांच्या चेकचे वाटप करणं हा पदाचा अपमान आहे. मला उद्धव ठाकरेंना विचारावंसं वाटतं की या अपमानाने तुम्ही का व्यतित झाला नाहीत? हा केवळ मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर शेतकऱ्यांचाही अपमान आहे. ज्या शेतकऱ्यांनी वादळात आपलं घर गमावलं, अशा शेतकऱ्याला कुठल्यातरी योजनेतील अवघे तीन हजार रूपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेकमार्फत दिले जातात ही शरमेची बाब आहे. किमान आपल्या मुख्यमंत्र्यांची इभ्रत टिकवण्यासाठी तरी अशा लोकांवर कारवाई करा”, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 3:18 pm

Web Title: bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray talks about low level of cm distribution of relief fund cheques sence of humour vjb 91
Next Stories
1 “फडणवीस योग्य भूमिका मांडत आहेत,” विधानसभा अध्यक्षांनी वाढीव वीज बिलावरुन खडसावलं
2 “सत्ता डोक्यात जाता कामा नये,” कंगना आणि अर्णबच्या मुद्द्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक
3 कंत्राटी शेतीचा कायदा सगळ्यात आधी महाराष्ट्राने केला, सरकारचा विरोध बेगडी-फडणवीस
Just Now!
X