News Flash

एक दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते हे कळेल: पाटील

चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सिंधुदुर्गात पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांच्या समवेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकरही होते.

चंद्रकात पाटील (संग्रहित छायाचित्र)

एक दिवसासाठी भाजपा नेते व्हा, कशी कसरत करावी लागते हे समजले असे विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. युतीमध्ये आम्ही चार वर्ष समतोल राखण्यात यशस्वी ठरलो, असेही त्यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सिंधुदुर्गात पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांच्या समवेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकरही होते. युतीबाबत प्रश्न विचारले असता चंद्रकात पाटील पत्रकारांना उद्देशून म्हणाले, मी तुम्हाला अशी ऑफर देतो की तुम्ही एक दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा. शिवसेना, आरपीआय, जानकर, खोत, शेट्टी या सर्वांचा समतोल करत कसे पुढे जावे लागते याचा तुम्हाला अंदाज येईल, असे त्यांनी सांगितले. आम्ही गेली चार वर्षे समतोल राखण्यात यशस्वी ठरलो. आता एक वर्षही पूर्ण करु. निवडणुकीत पुन्हा महायुती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  युतीबाबत मी कधीच साशंक नव्हतो. शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारालाच मतदान केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे त्यांच्या विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी घुमजाव केले होते. मी कुठलाही राजकीय संन्यास घेणार नसल्याचे सांगत मी ते विधान वेगळ्या अर्थाने केल्याचे स्पष्टीकरण दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 4:41 pm

Web Title: bjp leader for one day chandrakant patil offer to reporters in sindhudurg
Next Stories
1 कंत्राटदाराला ‘मनसे’च्या शैलीत जाब विचारा; खड्ड्यांवरुन राज ठाकरे आक्रमक
2 कोकणच्या जमिनीची वाट लावणारे प्रकल्प लादण्याचा प्रयत्न: राज ठाकरे
3 धक्कादायक! सावकारांच्या जाचामुळे पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
Just Now!
X