भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातीलही काही नेत्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता भाजपा नेते नारायण राणे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.

“माझी करोना चाचणी सकारात्मक आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन,” असं राणे म्हणाले. यापूर्वी नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनादेखील करोनाची लागण झाली होती.