सध्या राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतु करोनाग्रस्तांची माहिती किंवा त्यांची नावं जाहीर करू नये असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. असं करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही सरकारनं दिला होता. यावरून आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या आजारातून बरं झालेल्या बाळाचं नाव घेतलं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल त्यांनी केला आहे.
यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्रही लिहिलं आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात सहा महिन्याच्या एका बाळाचं करोना पॉझिटिव्ह म्हणून नाव घेतलं होतं. तसंच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकाराचं नाव करोना पॉझिटिव्ह म्हणून घेतलं होतं. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद पाटील यांनी एका नेत्याचं नाव करोना पॉझिटिव्ह म्हणून घेतलं होतं. त्यांच्याविरोधात गुन्हा केव्हा दाखल करणार?,” असा सवाल त्यांनी केला आहे.
कॉरोना पेशंट चे नाव घेतले म्हणून टी वी चॅनल वर गृह मंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई केली, आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉरोना पेशंट चे नाव घेतले, त्यांचा विरोधात कारवाई, एफ आय आर करणार का?@AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/a3eWiLd9dD
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 17, 2020
“एका वृत्तवाहिनीनं एका कार्यकर्त्याचं करोना पॉझिटिव्ह म्हणून नाव घेतलं. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर तिघांविरोधात गुन्हा केव्हा दाखल होणार,” असंही ते म्हणाले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 9:15 pm