“मराठा समाजाला आरक्षणाच्या अभ्यासाचा विषय कुठे येतो. आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांचा अभ्यास असेल आणि माझा अभ्यास कमी असेल तरीही मला त्याबाबतची जास्त समज आहे. माझा अभ्यास कमी असेल पण ज्यांचा याविषयी अभ्यास आहे त्यांनी आरक्षण का मिळाले नाही याचे उत्तर द्यायला हवे. मला तर याबाबत उत्सुकता आहे. छगन भुजबळ यांचा अभ्यास जास्त असेल तर त्यांनी उत्तर द्यावे. परंतु छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही,” असे म्हणत खासदार उदयनराजे यांनी भुजबळांना टोला लगावला.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उदयनराजेंचा अभ्यास कमी असल्याचे छगन भुजबळ म्हणाले होते. याबाबत उदयनराजे बोलत होते. “मराठा समाजाला आरक्षणाच्या अभ्यासाचा विषय कुठे येतो. आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांचा अभ्यास असेल आणि माझा अभ्यास कमी असेल तरीही मला त्याबाबतची जास्त समज आहे. भुजबळ हे वयाने मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबाबत काही बोलणार नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या बाबतचा अभ्यास करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. आरक्षणा का मिळाले नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता मला आहे, परंतु याबाबत कोणी बोलत नाही. जे इतरांचे आरक्षण आहे ते त्यांना द्या. माझा जर अभ्यास असता तर मी माझ्या मनाला येईल असेच केले असते,” असेही उदयनराजे म्हणाले.

गन्हेगारी, अत्याचाराबाबत कडक कायद्याची गरज

गुन्हेगारी व अत्याचार, बलात्काराबाबत कडक कायद्याची गरज आहे आणि कायद्याबाबत भीती गुन्हेगारांना असली पाहिजे. बलात्कारासारख्या घटना कदापि कोणाविषयी होऊ नयेत. पाकिस्तानसारखा बलात्काराचा अत्याचाराचा कायदा मागेच देशांमध्ये आणायला हवा होता. कडक कायद्या शिवाय गुन्हेगारांमध्ये दहशत बसणार नसल्याचेही उदयनराजे यांनी सांगितलं.