“आमचा तोल गेला तर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढू आणि नंतर ते महागात पडेल. आमच्याकडे नजर फिरवु नका, नाही तर कपडे संभाळताना पळताभुई थोडी होईल” अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला. कालच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या सुपूत्रांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी बेडूक अशी संभावना करुन राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

त्याच टीकेचा आज नारायण राणेंनी समाचार घेतला. “इतकीवर्ष साहेबांकडून पाहून गप्प बसलो. पण राणे कुटुंब, भाजपावर आगपाखड केली, तर ३९ वर्ष शिवसेनेत जे पाहिलं, अनुभवल तरे सारं बाहेर येईल असा इशाराच राणेंनी दिला. निवडणुकीच्याआधी हिंदुत्व मुख्यमंत्री बनताना सेक्युलर हे गांडूळसारख झालं”

आणखी वाचा- “बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं”

“बेडूक एका दिशेने जातो, गांडूळ दोन्ही बाजूंनी फिरतो. मराठीचे शब्द आम्ही काढले तर भारी पडेल, तू मुख्यमंत्री झाला मराठी माणसासाठी काय केले?” असा सवाल राणेंनी विचारला.

दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे ताळमेळ नसलेली निर्बुद्ध, शिवराळ बडबड
दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे कुठलाही ताळमेळ नसलेली निर्बुद्ध, शिवराळ बडबड होती. असं भाषण यापूर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं अशा शब्दात भाजपाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.

मुख्यमंत्री म्हणून एकवर्ष व्हायला आलं. त्यांनी राज्यामध्ये केलेल्या विकास कामाचा उल्लेख केला नाही. शेतकरी, शिक्षणाचे प्रश्न, राज्याची अर्थव्यवस्था याबद्दल काहीही बोललेले नाहीत अशी टीका नारायण राणे यांनी केली.

आणखी वाचा- जनाची नाही, तर मनाची वाटली पाहिजे – नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

कालच्या भाषणात करोनाचा उल्लेख केला नाही. करोनामुळे देशामध्ये सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले. राज्यात जवळपास ४२ हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. याची नैतिक जबाबार मुख्यमंत्र्यांवर येत नाही? त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी का केला नाही, असा सवाल राणेंनी विचारला.