News Flash

“… हे स्टार प्रचारक बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली अब्रू घालवणार”

स्टार प्रचारकांच्या यादीवरून निलेश राणेंचा शिवसेनेला टोला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही आठवडेच शिल्लक राहिले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची लगबग असून, शिवसेनेनंही बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती यापूर्वी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. दरम्यान, आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह २० जणांच्या नावांचा समावेश आहे. यावरून भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

“या स्टार कॅम्पेनर्सना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील वाचले नाही हा इतिहास आहे,” असं म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीका केली.

कोण आहेत स्टार प्रचारक ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

बिहार निवडणुकीत शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. असं असलं तरी त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसंच निवडणुकीचे निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील. याव्यतिरिक्त करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मतदारांना एका तासाचा अधिक कालावधी देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 11:57 am

Web Title: bjp leader nilesh rane criticize shiv sena bihar election star campaigners list cm uddhav thackeray aditya thackeray jud 87
Next Stories
1 अमर, अकबर, अँथनीच रॉर्बट शेठला पराभूत करतील; काँग्रेसचं रावसाहेब दानवेंना उत्तर
2 उपाहारगृहांत अल्प ग्राहक
3 रायगडात रस्ते अपघातांच्या प्रमाणात घट
Just Now!
X