News Flash

अन्वय नाईकांची आत्महत्या न पटणारी; सत्य लवकरच बाहेर पडेल : निलेश राणे

बुधवारी अर्णब गोस्वामींना करण्यात आली होती अटक

बुधवारी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनीदेखील आता या प्रकरणावर भाष्य केलं आहे. “अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत न्हवतं म्हणून अलिबागमध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली कारण पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य बाहेर पडेलंच,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटदेखील केलं आहे.

“तुम्ही माझं ट्वीट पाहिलं असेल त्यात मी म्हटलं होतं की ही आत्महत्या आहे हे पटत नव्हतं. एका व्यक्तीनं आणि त्यांच्या आईनं चार किंवा सहा कोटींसाठी का आत्महत्या केली हा माझ्यासमोर प्रश्न होता. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्याकडे ३०० कोटींची मालमत्ता आहे हे सांगण्यात येत आहे. अशी व्यक्ती ४-६ कोटींसाठी का आत्महत्या करेल? हे माझ्या मनाला पटत नव्हतं,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं.

“यानंतर त्या ठिकाणी माझ्या परिचयाच्या लोकांशी संपर्क साधला. पैशाच्या कारणाऐवजी काही वेगळही कारण त्यात असू शकतं अशी शंका त्यांच्याही मनात आहे. पण ती कारवाई, तपास कसा होईल हे पाहू. पण सहा कोटीसाठी ३०० कोटींची मालमत्ता असलेली व्यक्ती आईसोबत का आत्महत्या करते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याची उत्तरं महाराष्ट्राला कळलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 3:31 pm

Web Title: bjp leader nilesh rane says wont belive anway naik suicide beacause of money republic tv arnab goswamy arrested maharashtra police jud 87
Next Stories
1 मंदिरं उघडण्यासाठीची मार्गदर्शकतत्वे तयार!
2 “तळी उचलणाऱ्या एका संपादकाला…” अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरुन राजू शेट्टी संतापले
3 “कलम ३०६, ३०७ नुसार अटक व्यक्तीसाठी भाजपाला निषेध करायचा असेल तर तो त्यांचा अधिकार”
Just Now!
X