27 February 2021

News Flash

“…मग आडनाव बॅनर्जी, ठाकरे असो किंवा पवार, ते आडवे करणारचं”

भाजपा नेत्याचा निशाणा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने आपले पाय बळकट करण्यास सुरूवात केली आहे. बंगालमध्ये आज आणि शनिवारीही भाजपाचा झंझावात दिसून आला. बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शनिवारी तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला. या महाभरतीनंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. दरम्यान, भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी यावरून आता निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ पश्चिम बंगालमधील भाजपाच्या एका सभेचा असल्याचा दावाही राणे यांनी केला आहे. या व्हिडीओत लोकांची मोठ्या प्रमाणता गर्दी दिसून येत आहे. “पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सभा. एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संजय राऊत हे बघून ठेला. विसरू नका. अति तिथे माती होणारच,” असं म्हणत राणे यांनी निशाणा साधला.

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला. शाह यांच्या उपस्थितीत तृणमूलमधून बाहेर पडलेल्या सुवेंदु अधिकारी यांच्यासह ११ आमदार व एका माजी खासदाराने कमळ हाती घेतले. शनिवारी मिदनापूर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

ममता बॅनर्जी एकट्याच राहतील

“आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का?,” असा सवाल शाह यांनी ममता बॅनर्जी यांना केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 2:13 pm

Web Title: bjp leader nilesh rane slams shiv sena sanjay raut uddhav hackeray ncp sharad pawar mamata banergee shares video jud 87
Next Stories
1 जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
2 होय! मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी : उद्धव ठाकरे
3 अनेकजण डोळे लावून बसले होते, पण…; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा समाचार
Just Now!
X