News Flash

“जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले त्यांनी…;” निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण करण्याचा घेण्यात आला होता निर्णय

उद्धव ठाकरे आणि निलेश राणे

करोनापासून कधी मुक्तता मिळेल, याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर भाष्य केलं. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

“जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही,” असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची अनिश्चितता पाहता अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटरवरून टीका केली.


करोनापासून कधी मुक्तता मिळेल, याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला.अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबली तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंतच्या सत्रांत (सेमिस्टर) मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी वाढवण्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा- “तोच तणाव, गडबड आणि दबाव….जणू माझीच अंतिम वर्षाची परीक्षा होती”

तर दुसरीकडे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हे पालक-विद्यार्थी-शिक्षक या सर्वच वर्गांच्या संपर्कात होते. पहिल्यांदाच मंत्रीपद भूषवत असल्याने हे प्रकरण हाताळताना आपपल्यावर खूप मोठं दडपण होतं असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं आहे. प्राजक्त तनपुरे यांनी विद्यार्थ्यांसाठी यानिमित्ताने एक खुलं पत्र लिहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 2:30 pm

Web Title: bjp leader nitesh rane criticize shiv sena cm uddhav thackeray final year exam passing marks jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘त्या’ विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र द्या, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
2 पालघर : शासनाच्या निर्णयाविरोधात मच्छिमारांचे आंदोलन
3 Good News: मान्सूनची केरळ किनारपट्टीवर धडक, लवकरच महाराष्ट्रात येणार…
Just Now!
X