News Flash

“सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू”, पंकजा मुंडेंची सरकारवर परखड टीका!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संजय राठोड प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

संग्रहित छायाचित्र

“ज्या प्रकारे फक्त सरकार टिकवण्यासाठी किंवा आघाडी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठिशी घातलं जातंय, ते चुकीचं असून मी त्याचा निषेध करते”, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. सध्या ज्या प्रकारची उदाहरणं प्रस्थापित केली जात आहेत ती पुढच्या राजकारण्यांसाठी प्रस्थापित होत आहेत. ही दुर्दैवी बाब आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनी देखील राजीनामा द्यायला हवा, या मागणीचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला. सोमवारी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

…याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी!

दरम्यान, यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची तपास यंत्रणांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. “मुख्य पीडिता बाजूला राहून वेगळंच राजकारण उभं केलं जात आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. तो दिला की घेतला हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. राजीनामा तर दिला, पण आता चौकशीचा मुद्दा आहे. राजीनामा ही चांगलीच गोष्ट झाली. आता यंत्रणांनी नि:पक्षपातीपणे त्या प्रकरणाचा तपास करावा. तसा तो होईल, याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी”, असं मुंडे म्हणाल्या.

राजकीय व्यक्तींवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी!

संजय राठोड आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना पंकजा मुंडेंनी एका वेगळ्या तपास यंत्रणेची आवश्यकता व्यक्त केली. “राजकारणात जे लोकं वावरत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल असतील, तर त्याची चौकशी करण्यासाठी आता वेगळी यंत्रणाच लागेल असं दिसतंय”, असं त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 5:29 pm

Web Title: bjp leader pankaja munde criticizes cm uddhav thackeray on sanjay rathod case pmw 88
Next Stories
1 ‘एमपीएससी’ने उमेदवारांसाठी सुरू केली नवीन सुविधा
2 “मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री….”
3 “पूजाच्या आई-वडिलांना राठोड यांनी पाच कोटी रुपये दिलेत; त्यामुळेच त्यांना हत्येविषयी काही बोलायचे नाही”
Just Now!
X