आधी विधान परिषद… नंतर राज्यसभा आणि आता मंत्रिमंडळात मुंडे भगिनींना डावलण्यात आल्यानं मुंडे समर्थकांची नाराजी बाहेर पडली. त्यावरून राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या. मुंडे भगिनींना डावलण्यासाठी कराडांना मंत्रिमंडळात घेण्यात आल्याचंही बोललं गेलं. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं. राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी दिल्लीतून मुंबईत परतताच आज संवाद साधला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी कुणाच्याही नामोल्लेख केला नाही. मात्र राज्यातील भाजपा नेतृत्वावरील त्यांची नाराजीही लपून राहिली नाही. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी वेळ आली तर कठोर निर्णयही घेऊ असा इशाराही दिला.

मुंबईत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजा म्हणाल्या, “माझे नेते मोदी… माझे नेते अमित शाह… माझे नेते जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. मला माझ्यासाठी काहीही नकोय. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला यशस्वीसाठीही काही नकोय”, असं म्हणत “मला भाजपाने विधान परिषदेला अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणं शक्य नाही. मी त्यांना म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचं नाव आलं, काय बिघडलं? मी कोण आहे… तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका”, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान

…मग मी कोण आहे?

“मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. भागवत कराडांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मी त्याचं स्वागत केलं. मी माझ्यापेक्षा वयाने मोठं असणाऱ्या व्यक्तींचा अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, हे धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस वैयक्तिक हेतूने कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

सगळं कॅबिनेट पंकजा मुंडे होती का?

यावेळी पंकजांनी कौरव-पांडव यांच्यातील समरप्रसंगाचं उदाहरण दिलं. “कौरव आणि पांडवातील युद्ध पांडवांनी जिंकण्याचं आणखी एक कारण होतं. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कळलं का तुम्हाला. त्यांच्या रथावर असलेले सारथीसुद्धा त्यांच्यासोबत नव्हते. काळ कधीच थांबत नसतो. तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू घेऊन तुम्ही घरी जा. मला का मिळालं नाही, अशा चिल्लर लढाईत मला पडायचं नाही. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. तुम्ही सगळे माझे महारथी आहात. काही लोकांनी असं भाष्य केलं की, पक्षाने दिलेलं मी विसरणार नाही. सगळं कॅबिनेट पंकजा मुंडे होती का? सगळ्यांनाच मंत्रिपद मिळाली. नेत्यांचे कान भरून मोठं होणारी मी नाही. मला दिलं, मी ते नाकारत नाही. चंद्रकांत पाटीलही महसूलमंत्री झाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. आशिष शेलारांनीही चांगलं वक्तव्य केलं. पण मला आई आणि बाप अशा दोन्ही भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात”, अशी भूमिका पंकजा यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.

कराड यांच्या शपथविधीलाही गेले असते

“आपल्या जीवनातील स्पिरीट असंच ठेवा. मी न बोलताही तुम्हाला कळलं आहे. तुमचंही मला कळलेलं आहे. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. मला संधी मिळाली असती, तर मी भागवत कराड यांच्या शपथविधीलाही गेले असते. ऊसाच्या फडात काम करणाऱ्या माणसाला सभापती बनवलेलं आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदापेक्षा मला हे महत्त्वाचं आहे. गरीब माणूस बाजार समितीचा सभापती असल्याचा मला अभिमान वाटतो. वंचितांचा वाली बनण्याचं गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं, तेच स्वप्न आपलंही आहे. पण, इथे आता राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल, त्यादिवशी बघू”, असं म्हणत पंकजा मुंडे वेळ आली तर कठोर निर्णय घेऊ असे संकेत दिले.