राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघाची निवडणूक खास गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या भाऊ-बहिणींमध्ये या मतदारसंघात काटें की टक्कर पहायला मिळाली. मात्र धनंजय मुंडे यांनी विजय मिळवत आपल्या बहिणीला पराभूत केलं. पंकजा यांचा पराभव कसा झाला यावर त्यानंतर बरीच चर्चा झाली, अनेकांनी या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. मात्र आता पाच महिन्यानंतर पंकजा यांनीच आपल्या पराभव का झाला याचे उत्तर दिलं आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना पंकजा यांनी त्यांच्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाची आठवण करुन दिली.

“आई तू इतकी चांगली आहेस मग तू जिंकली का नाहीस?, असा प्रश्न माझ्या पराभवानंतर माझ्या मुलानं मला विचारला. तू तुझा पेपर लिहितो म्हणून तुला सांगता येतं की इतके मार्क आहेत. आमच्याकडे मात्र मी अभ्यास करते आणि पेपर दुसरेच लिहितात त्यामुळेच मी पराभूत झाल्याची शक्यता आहे,” असं पंकजा यांनी सांगितलं. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय पदवी ग्रहण समारंभाच्या प्रसंगी पंकजा बोलत होत्या.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
Dhangar reservation
धनगर आरक्षण तांत्रिक बाबीमध्ये : आमदार गोपीचंद पडळकर

या संभाषणादरम्यान एकाने पंकजा यांना सध्या तुम्ही काय करता असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “एखाद्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर तो आराम करतो आणि बाकीचे येऊन त्यावर सह्या करुन लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा देतात, तसंच माझं सध्या सुरु आहे. मी फ्रॅक्चर झाले आहे,” असं मिश्कील उत्तर पंकजा यांनी दिलं. त्यांच्या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला.