देशास सध्या करोनानं थैमान घातलं असून त्याविरोधात सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. अशा परिस्थितीत लोकांचं मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ शेअर करत पंतप्रधानांच्या निर्णयावर टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर भाजपाचे नेते आणि विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे.

संपूर्ण जगानं, युनेस्को आणि जागतिक आरोग्य संघटनेसारख्य संस्थेनेसुद्धा ज्यांच्या कोरोनाविरुद्धच्या प्रयत्नांचे कौतुक केले, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करताना थोडी मनाची तरी बाळगा. जनाची सोडलीच असणार. सरळ तबलीग जमातीत सहभागी व्हा, असं म्हणत प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. त्यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

“espirit de corps हा मूळ फ्रेन्च शब्दप्रयोग आहे. मूर्ख नसलेल्या आव्हाड यांनी जरा तो गुगल करून पाहावा. गूगल ते इंग्रजीत सांगेल. नाहीच कळला तर म्हणून मराठीत सांगून ठेवतो. सहकार्याची किंवा एकजुटीची भावना असा त्याचा अर्थ होतो, ” लाड म्हणाले. तसंच अर्थात मतदार संघातल्या विशिष्ट जमातीला खूष करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कसं समजणार सहकार्य किंवा एकजुटीची भावना? एक प्रसिद्ध वाक्य आहे ‘ स्वत:ची जो करे स्तुती, तो एक मुर्ख.’ ” मी मूर्ख नाही ” ही स्वत:ची स्तुतीच ना ? असं म्हणत त्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली.

आणखी वाचा- देशाला इतकंही मुर्खात काढू नका; जितेंद्र आव्हाडांची पंतप्रधान मोदींवर टीका

काय म्हणाले आव्हाड ?
“संपूर्ण देशाला आशा होती की, मोदी जीवनावश्यक वस्तूंबद्दल बोलतील. भारतातील कोणताही गरीब नागरिक उपाशी झोपणार नाही, याबद्दल बोलतील. मास्क, सॅनिटायझर आणि औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. याची कमरता पडणार नाही, याच्यावर बोलतील. आम्ही नवीन लस शोधून काढतोय, याविषयी बोलतील. टेस्टिंग किट कमी पडणार नाही, याच्यावर बोलतील. देशामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि भयग्रस्त झालेल्या जनतेला आधार देतील, असं वाटल होतं. तर त्यांनी आता नवीनच इव्हेंट काढला,” असं आव्हाड म्हणाले होते.