News Flash

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत भाजपा नेत्याने व्यक्त केला अंदाज

संग्रहित (पीटीआय)

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत.” असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर केंद्र सरकारवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेवरुनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “केंद्र सरकारवर टीका करणं म्हणजे स्वतःचं अपयश झाकायचं आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता? ” असाही प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा- सोनारानंच कान टोचले हे बरं झालं; भगवा फडकवण्यावरील पवारांच्या प्रतिक्रियेवरून भाजपाचा टोला

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा” असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले.

आणखी वाचा- “वेळ पडली तर उद्धव ठाकरेंनाही…,” राज्यपाल भेटीनंतर राज ठाकरे आक्रमक

शरद पवार काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. “शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३० ते ३५ वर्षे ऐकतोय आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरही विखे पाटील आक्रमक झाले होते. “मला आश्चर्य वाटतं की सरकार मंदिरं उघडायला का घाबरतं आहे. यांना परमेश्वराची एवढी भीती का वाटते? तुम्ही मदिरालयं उघडण्यासाठी परवानगी दिली. मात्र मंदिरं उघडण्यासाठी परवानगी देत नाही. त्या त्या भागातील अर्थशास्त्र हे मंदिरांवरती अवलंबून आहे. हा फक्त भावनिक मुद्दा नाही, अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. याचा विचार सरकारने करायला हवा.” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 7:50 am

Web Title: bjp leader radhakrishna vikhe patil attacked thackeray government scj 81
Next Stories
1 “बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो”
2 गांधी विचारांचा प्रतिकृतीमधून प्रसार
3 हजार कोटींहून अधिक रुपयांची हानी
Just Now!
X