News Flash

मुंबई लोकल प्रकरण: “सरकारला चिंता कोणाची… जनतेची की बारवाल्यांची?”

भाजपा नेत्याचा ठाकरे सरकारला स्पष्ट सवाल

अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबई लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारने दिलासा दिला आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती, मात्र १ फेब्रुवारीपासून काही ठराविक वेळेत सर्वांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु सरकारने दिलेल्या वेळांवरून आता राजकारण रंगू लागलं आहे. भाजपा नेते राम कदम यांनी तर बोचरी टीका सरकारला बारवाल्यांची जास्त चिंता आहे का? असा स्पष्ट सवाल केला आहे.

“महाराष्ट्र सरकारने जर मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय पाच महिन्यांपूर्वी घेतला असता तर लाखो लोकांना होणारा त्रास वाचला असता. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यादेखील वाचल्या असत्या. पण सरकारच्या निष्काळजीपणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मंदिरं उघडण्याआधी बार उघडण्यासाठी परवानगी देणारं सरकार सामान्य प्रवाशांना रात्री साडे नऊनंतर लोकल प्रवासासाठी परवानगी देत आहे. साडे नऊनंतर लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की बारवाल्यांना? असा सवाल राम कदम यांनी केला.

आणखी वाचा- Mumbai local : ‘या’ वेळा पाळा, नाहीतर होणार फजिती

“महाराष्ट्राच्या सरकारला नक्की कोणाची चिंता आहे… जनतेची की बारवाल्यांची? सरकारच्या अशा निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला सातत्याने विविध संकटांचा सामना करावा लागतो आहे आणि त्रास भोगावा लागतो आहे. त्यामुळे हे सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर कधी होणार? असा सवाल राम कदम यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 3:55 pm

Web Title: bjp leader ram kadam angry slam uddhav thackeray over local train timings for common man bar drunkard vjb 91
Next Stories
1 अण्णा हजारेंच्या मागण्यांवर उपाययोजना केल्या आहेत- देवेंद्र फडणवीस
2 “राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, पण…”- जयंत पाटील
3 राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला
Just Now!
X