01 December 2020

News Flash

मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप

मुंबईला वेगळ करण्यासाठी भाजपाचं राजकारण, राऊतांचं वक्तव्य

“भाजपा एक राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना मुंबईत, मुंबईच्या उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस असल्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत रस आहे. हे गेले पन्नास वर्षे सुरू आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणं करायचं आहे. आम्ही ते होऊ देत नाही. त्यांना मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे. मुंबई ओरबाडण्याला आमचा विरोध आहे. कोणाच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी मुंबई महानगरपालिकेवर आज जो भगवा फडतोय त्याला हात लावण्याची, तो खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हाच जळून खाक होतील,” असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला होता.

“त्या भगव्यामध्ये लाखो, कोट्यवधी लोकांचा त्याग, रक्त सांडलं आहे,” असं राऊत म्हणाले. “फडणवीस हे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधानं करू शकतात. जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही, असं भाजपाला वाटत असेल आणि जे कोणी भगवा फडकवणार आहेत तो शुद्ध आहे हे जनताच ठरवेल. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा असून गेली ५० वर्षे तो मुंबई महानगरपालिकेवर फडकत आहे,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- …मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?; चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल

भाजपा मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईला वेगळं करण्याचं भाजपाचं राजकारण आहे. कोणी नटी मुंबईला पीओके म्हणाली, मुंबई पोलिसांना माफीया म्हणाली. ती भाजपाची कार्यकर्ती आहे. तिच्या समर्थनार्थ असणाऱ्यांना मुंबई देणार का असा सवालही राऊतांनी केला. “राजकारणात सर्वांकडूनच इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे प्रत्येक भाषणात इशारे देत असतात. एखादी गोष्ट चुकीची होत असल्यास इशारा दिला जातो. तुमच्या पक्षाचे नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खोटेनाटे आरोप करत असतील आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार.ही लोकशाहीतील महत्त्वाची भूमिका आहे,” असं राऊत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:45 pm

Web Title: bjp leader sanjay raut criticize bjp over mumbai bmc statement devendra fadnavis jud 87
Next Stories
1 हृदयद्रावक! विजेच्या धक्क्याने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू
2 …मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?; चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल
3 …आणि मग ‘पेंग्विन गँग’ची पार्टी सुरु; वीज बिलांवरुन नितेश राणेंचा खोचक टोला
Just Now!
X