News Flash

“नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी ‘महात्मा’ होतं का?”

"गांधी घराण्याशी आपण किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याची काँग्रेसमध्ये स्पर्धा"

महाराष्ट्राच्या मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. या टीकेला भाजपाकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं. तसेच यशोमती ठाकूर यांच्यापुढे काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी महात्मा होतं का? असा सवाल करत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत”

“नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनतं का? सोनिया नाव धारण करून ॲन्टोनीया माईनो यांचे वास्तव लपणार आहे का? आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलते का? गांधी घराण्याची गुलामगिरी करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या साऱ्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात आणि प्रश्नांची उत्तरं द्यावीत”, असे शिवराय कुळकर्णी म्हणाली.

“महाराष्ट्राच्या ‘वाघा’ला घरच्यांनीच मरतुकडा म्हणणं म्हणजे…”; भाजपाची बोचरी टीका

“शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि प्रियांका रॉबर्ट वाड्रा यांच्या तिजोऱ्या भरणाऱ्या काँग्रेसी गुलामांनी शेतकरी हिताचा पुळका दाखवू नये. काँग्रेसच्या सत्ताकाळात रॉबर्ट वाड्रा यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी गिळल्याचा इतिहास ताजा आहे. काँग्रेसने नाहक पुतनामावशीचे प्रेम दाखवू नये. जो पक्ष एका घराण्याच्या गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकला आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. स्वतःचेच तोंड स्वतःच्याच थुंकीने मलीन करण्याचा हा प्रकार आहे”, असा टोला त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

भाजपाच्या आशिष शेलारांनी केलं उद्धव ठाकरेंच्या मुलाचं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

“दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. गांधी घराण्याशी आपण किती एकनिष्ठ आहोत हे दर्शवण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये कायम सुरू असते. त्यात यशोमती ठाकूर कायम आघाडीवर असतात. मोदींवर टीका करून काँग्रेसमध्ये आणखी वरचे पद मिळते, या अनुभवातून यशोमती ठाकूर आपल्या मंत्रीपदाची चुणूक दाखवण्याऐवजी रोज नित्यनेमाने मोदींवर शाब्दिक हल्ला चढवत असतात. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचा इतिहास आम्हाला पुन्हा उगाळायला लावू नका. स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि सर्वांना कर्जमाफीचा लाभही नाही. राज्यात रोज सर्वत्र महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. यशोमती ठाकूर यांनी प्रथम त्यावर लक्ष द्यावे. त्यांनी प्रथम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या व राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या समस्या सोडवून दाखवाव्या”, असे आव्हान शिवराय कुळकर्णी यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 3:24 pm

Web Title: bjp leader slams criticises rahul gandhi sonia gandhi over fraud cheating false surname pm modi vjb 91
Next Stories
1 महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत!
2 अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी; खळखट्याकनंतर बॅकफूटवर
3 पुन्हा कोल्हापूरला जाणार म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा टोला; म्हणाले…
Just Now!
X