News Flash

मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा टोला

आज सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.

“कुंभकर्ण आज असता तर आमच्यापेक्षाही कोणी मोठा भाऊ आहे हे पाहून आत्महत्या केली असती,” असं म्हणत माजी अर्थंमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला. २८ नोव्हेंबर रोजी राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झालं. असं असलं तरी विरोधकांनी राज्यातील करोनाची परिस्थिती, मराठा आरक्षण, वीजबिल अशा मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका करण्याचे प्रयत्न केले आहेत. मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधला.

“जेव्हा मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो त्यात ‘यू’ या अक्षरावरून नाव सुरु होतं आणि अदिती तटकरे यांचं ‘ए’ वरून सुरू होणारं नाव अखेरचं येतं तेव्हा बाराखडी जशी उलट सुरू झाली तसं यांचं कामही उलटं झालं. गेलं एक वर्ष उलटसूलट काम करणारं सरकार आपण अनुभवतो आहोत,” असंही मुनगंटीवार म्हणाले. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं लोकमान्य टिळकांचं वाक्य सर्वांच्या परिचयाचं आहे. परंतु आज आपण जेव्हा सरकारचे निर्णय पाहतो तेव्हा सरकार डोकं ठिकाणावर आहे का हे खरंच आहे, परंतु सरकारच ठिकाणावर आहे का असा प्रश्न टिळक आज असते तर विचारला असता असं मुनगंटीवार म्हणाले.

मुलाखतीतलं त्यांचं भाष्य ऐका. आर्यभट्टानं शून्याचा शोध लावला. इतिहारासत नोंद झाली पण राज्य सरकार कार्यशून्य आहे. जे काही करेल ते केंद्र सरकार करेल असा शोध केंद्रानं लावला, असंही मुनगंटीवार म्हणाले. “प्रत्येक मंत्री आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीची रक्कम दिली नसल्याच्या बोंबा मारत आहे. वीजबील माफ करायचं असेल तर केंद्र सरकारने पैसे दिले पाहिजे अशी मागणीही केली जात आहे. तुम्ही फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या. तुमचं काम काय?, असा प्रश्नही त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 6:35 pm

Web Title: bjp leader sudhir mungantiwar criticize mahavikas aghadi government cm uddhav thackeray one year completed jud 87
Next Stories
1 “थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…” भाजपा नेत्याचा सरकारला उपरोधिक टोला
2 महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीला १०० पैकी….. एवढेच गुण जनता देईल-आठवले
3 “विरोधकांना कोडगे-निर्लज्ज म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेबाबत बोलणं म्हणजे…”
Just Now!
X