News Flash

…हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही : धनंजय मुंडे

भाजपाच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहेे

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपाला मोठ्याप्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. विरोधीपक्षांच्या नेते मंडळींसह सोशल मीडियाद्वारे देखील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाविकासआघआडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

“हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही.” असा इशारा मुंडे यांनी भाजपाला दिला आहे.

धनंजय मुंडे याच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते राजीव सातव, राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या मुद्यावरून भाजपावर जोरादार टीका केली आहे. शिवाय, या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून भाजापाने माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन करण्यात आले. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 7:20 pm

Web Title: bjp leaders hurt marathi peoples sentiments dhananjay munde msr 87
Next Stories
1 … हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का -संजय राऊत
2 शिवसेनेचे ३५ आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
3 संतापजनक! मराठी साहित्यिकांना कर्नाटक बंदी
Just Now!
X