News Flash

राजकीय पुनर्वसन!, भाजपाच्या मेधा कुलकर्णी यांची महिला राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णा यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. भाजपाच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाच्या मेधा कुलकर्णी यांची महिला राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णा यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. भाजपाच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर त्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मेधा कुलकर्णी यांच्यासह सहा जणींची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मालती रॉय (पश्चिम बंगाल), दर्शना सिंह (उत्तर प्रदेश), रेखा गुप्ता (दिल्ली), विरेंदर थांडी (पंजाब), ज्योतीबेन पांड्या (गुजरात), पूजा मिक्षा (राजस्थान) यांचा समावेश आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सहमतीनंतर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. सुखबीर कौर, इंदु बाला गोस्वामी आणि दीप्ती रावत यांची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं होतं. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवून विजयी झाले होते. मेधा कुलकर्णी यांना पक्षाकडून योग्य सन्मान दिला जाईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्या कोणत्याही पदावर नव्हत्या. आता त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे.

उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त; ‘ईडी’ची मोठी कारवाई

मेधा कुलकर्णी २०१४ ते २०१९ या कालावधीत पुण्यातील कोथरुडमधून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांना १ लाख ९४१ मतं पडली होती. तर त्यांना २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी या मतदार संघातून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिकीट देण्यात आलं होतं. त्यांना १ लाख ५ हजार २४६ मतं पडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 10:48 pm

Web Title: bjp medha kulkarni political rehabilitation appointed as women national vice president rmt 84
टॅग : Bjp
Next Stories
1 भाजपाला विदर्भात धक्का! ९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2 Coronavirus : राज्यात दिवसभरात १३ हजार ७५८ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी ९५.८९ टक्के
3 सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा!; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Just Now!
X