29 September 2020

News Flash

राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांनी शिवरायांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेवून काढले फोटो

डोंबिवलीतील भाजपा आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उल्हासनगर महापालिकेतील फोटोंवरुन वाद निर्माण झाला आहे.

डोंबिवलीतील भाजपा आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उल्हासनगर महापालिकेतील फोटोंवरुन वाद निर्माण झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढले. रवींद्र चव्हाण यांच्या या वर्तनामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शुक्रवारी उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होती. पण कोणी उमेदवार नसल्याने भाजपाच्या पंचम कलानी बिनविरोध निवडून आल्या. विजयी झाल्यानंतर पंचम कलानी, ओमी कलानी यांनी शिवरायांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्याचवेळी रवींद्र चव्हाण यांनी शिवरायांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढले. या फोटोंवरुन रवींद्र चव्हाण यांच्यावर चौफर टीका होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 8:51 pm

Web Title: bjp mla minister ravindra chavan contravarsial photoshoot
Next Stories
1 शिवसेनेचा डाव फसला, उल्हासनगरमध्ये भाजपाच्या पंचम कलानी महापौरपदी
2 शीळ-कल्याण उड्डाणपूल रद्द?
3 घंटाळी मैदानावरून शिवसेनेची कोंडी
Just Now!
X