सर्वोच्च न्यायालयाने काल बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवून तपासात सहकार्य करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिल्या. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे.

भाजपाकडून महाराष्ट्र सरकारवर टीका सुरु आहे. बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केले म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असे कुणाचे निरीक्षण असेल व त्या आधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज देशाची घटना ही अश्रू ढाळत असेल, असे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

याच मुद्यावरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी टि्वट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय : 1.) मराठी अस्मिता 2.) महाराष्ट्र धर्म 3.) मराठी माणूस असे असतील. Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही..तेव्हा Dino,Jacqueline,disha पाहिजे असतात..वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस ! असे टि्वटमध्ये म्हटले आहे. काल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नितेश राणे यांनी एक टि्वट केले होते.