News Flash

‘भाजपाच्या ओळखपत्रावर चंद्रकांत पाटलांचा फोटो असल्यास टोलमाफी’, सुरेश हाळवणकर यांचा गौप्यस्फोट

सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला

भाजपाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी भाजपाचं ओळखपत्र दाखवूनही टोल नाक्यावर टोलमाफी दिली जात नसल्याची तक्रार केली. यावर उत्तर देताना सुरेश हाळवणकर यांनी सांगितलं की, “हे ओळखपत्र टोलनाक्यावर चालत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ओळखपत्रावर चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्या कारणाने टोल नाक्यावरील कर्मचारी काही तरी समस्या निर्माण होऊ शकते, आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो असा विचार करतात. आमदार, नेते आणि काही कार्यकर्ते गेले म्हणून काय होतं असा विचार करुन ते सोडून देतात”.

यावेळी बोलताना सुरेश हाळवणकर यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं. बुथ कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील ११ हजार भाजपा कार्यकर्त्यांना ओळखपत्र दिल्याचं सांगितलं. कार्यकर्ते तिकडे काय धुमाकूळ घालत असतील, समजत नाही असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 1:53 pm

Web Title: bjp mla suresh halvankar chandrakant patil bjp idendity card toll free sgy 87
Next Stories
1 रत्नागिरी, संगमेश्वरमध्ये धुवाँधार; वशिष्ठी नदी पुलावरची वाहतूक बंद
2 नागपूर: चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने केली १९ वर्षीय तरुणीची हत्या
3 महाराष्ट्र काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळाला पण नेतृत्वासाठी पक्ष उरलाय?-शिवसेना
Just Now!
X