News Flash

बिहारी लोक राहतात इथं, त्यांना तिकडं मुलं होतात, भाजपा आमदारांचे वक्तव्य

यापूर्वीही भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनीही लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते.

भाजपा आमदार सुरेश धस

बीडचे विधान परिषदेवरील भाजपा आमदार सुरेश धस यांनी बिहारी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिहारी लोक राहतात इकडे आणि तिकडे त्यांच्या बायकांना मुले होतात, असे खळबळजनक वक्तव्य धस यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

बिहारचे लोक येतात आणि पेढा देतात. काय झाले, असे त्यांना विचारले तर मुलगा झाला असे सांगतात. कुठे झाला तर तिकडे झाला. ते राहतात इथे आणि त्यांना मुले तिकडे होतात, असे वक्तव्य त्यांनी एका जाहीर सभेत केले. उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली. पण यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वीही भाजपाचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पंढरपूर येथील प्रचार सभेत लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता सुरेश धस यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 2:12 pm

Web Title: bjp mlc suresh dhas controversy statement on bihari people in beed
Next Stories
1 जालन्यात संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात गोंधळ, पोलिसांचा लाठीमार
2 आर्थिकदृष्ट्या झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा – तावडे
3 पाठिंबा देणाऱ्या नगरसेवक – नेत्यांना सांभाळा’
Just Now!
X