28 February 2021

News Flash

भाजपा सोडण्यासाठी तुमच्यावर दबाव?; खडसेंच्या निर्णयावर सून रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया

खडसेंच्या निर्णयावर कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करत गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असले तरी खासदार असणाऱ्या त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे मात्र भाजपातच राहणार आहेत. एकनाथ खडसे यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान रक्षा खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना खडसेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

“आजचा दिवस अत्यंत दुखाचा आहे. बाबांनी जो निर्णय घेतला त्याचं दु:ख मलाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे,” असं त्या म्हणाल्या. भाजपामधून तुम्हीही बाहेर पडणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी भाजपाकडून निवडून आली आहे. लोकांनी मला भाजपा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे. मी पक्षाचं काम करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार. नाथाभाऊंनीदेखील ४० वर्ष पक्षात घालवली. पण व्यक्तिगत कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला”.

आणखी वाचा- रक्षा खडसे भाजपामध्येच राहणार; एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती

“पक्षाने दिलं हे त्यांनीही मान्य केलं आहे. पक्षासोबत त्यांचंही योगदान आहे. जेव्हा आपण व्यक्ती म्हणून काम करतो तेव्हा योगदान महत्त्वाचं असतं. नाथाभाऊंनी कधीही माझ्यावर मी सांगेन तसं करायचं असा दबाव टाकला नाही. त्यांनी संस्कार, शिकवण दिली. जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आणि तीच सेवा आज भाजपाच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे माझ्यावर कोणताहाी दबाव नाही,” असं रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 3:08 pm

Web Title: bjp mp raksha khadse on eknath khadse decision of joining ncp sgy 87
Next Stories
1 शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ती मागणी केली असती तर राजकीय संन्यास घेतला असता : खडसे
2 ज्या राष्ट्रवादीवर टीका केली, त्याच पक्षात प्रवेश करताय या प्रश्नावर खडसे म्हणाले…
3 रक्षा खडसे भाजपामध्येच राहणार; एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती
Just Now!
X