News Flash

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले….

करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नसल्याचं संभाजी भिडेंचं वक्तव्य

उदयनराजे भोसले संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य केलं आहे. सांगलीत बोलताना संभाजी भिडे यांनी करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं म्हटलं. यावेळी त्यांनी . जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का?,” अशी विचारणाही केली. दरम्यान संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत- संभाजी भिडे

साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसेल यांना संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उदयनराजे म्हणाले, “माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलेन”.

संभाजी भिडेंनी काय म्हटलं –
“मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही”.

पुढे ते म्हणाले की, “मी काही राजकीय माणूस नाही. पण माझ्यासारखी असंख्य लोक संपूर्ण देशात अस्वस्थ आहेत. हा मूर्खपणा सुरु आहे. करोना हा रोगच नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे”.

“करोनाच्या नावाखाली खेळखंडोबा सुरु आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार जबाबदार आहे. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का?,” अशी विचारणा संभाजी भिडे यांनी केली. “करोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील,” असंही ते म्हणाले.

“करोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल , सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद. करोना अस्तित्वात नाही. लॉकडाउनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे,” असंही ते म्हणाले.

“कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवर मास्क लावण्याचा हा नालायक सिद्धांत काढला आहे. मास्क लावण्याची काही गरज नाही. मास्क नसेल तर पोलीस काठ मारतात. हा सगळा मूर्खपणा आहे”, असंही संभाजी भिडे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 2:42 pm

Web Title: bjp mp udyanraje bhosale on sambhaji bhide statement over coronavirus sgy 87
Next Stories
1 राज्यात उद्योगांसाठी Oxygen निर्मिती बंद होणार; करोना रुग्णांना पुरवठा वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय!
2 नवेगाव नागझिरा आग : मृत वनमजूरांच्या वारसांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
3 कुटुंब नियोजन केलं असतं तर लसींचा साठा कमी पडला नसता – उदयनराजे
Just Now!
X