News Flash

“इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत”

"राष्ट्रवादीत चाललंय काय?"

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. (संग्रहित छायाचित्र)

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेली अटक यामुळे भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विरोधक वारंवार धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप गंभीर असून पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. तर नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप नसल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली आहे. यादरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला लगावला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं”.

निलेश राणे यांनी यावेळी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचं श्रेय नरेंद्र मोदींना दिलं आहे. “मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- “मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”

यादरम्यान मुंडे यांच्यावर आरोपाला नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 9:49 am

Web Title: bjp nilesh rane tweet ncp dhananjay munde nawab malik sgy 87
Next Stories
1 “मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”
2 राज्यातील मध्यवर्ती कारागृहांमध्ये १३४ टक्के कैदी!
3 नगरमध्ये ‘हुरडा पार्टी’तून कृषी पर्यटनाला चालना
Just Now!
X