राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपासोबत असल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, असं सूचक वक्तव्य नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. नितेश राणे यांनी यावेळी कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाहीच असा दावाही केला. शेती आणि शिवसेनेचा काही संबंध नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली.

आणखी वाचा- “सतत पवारांसोबत राहून राऊतांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली”

नितेश राणे यांनी म्हटलं की, “राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कृषी विधेयकावर मत मांडलं पण विरोध केला नाही. त्यांनी फक्त सभात्या केला. ‘ये अंदर की बात है’ अशी एक घोषणा आहे त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’ इतकंच मी तुम्हाला सांगू शकतो”.

आणखी वाचा- “…म्हणून सरकारनं शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये”

नितेश राणे यांनी यावेळी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. कृषी विधेयकावरील भाषणं ऐकली तर संजय राऊत यांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं असल्याचं लक्षात येईल. शिवसेनेला नेमकं कुठे जायचं आहे हेच माहिती नाही. शेती कुठे आणि कशी करायची हेदेखील त्यांच्या नेतृत्वाला माहिती नसून शेतीवर कधीही भूमिका घेत नाहीत अशी टीका नितेश राणे यांनी केली.