News Flash

भाजप राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून दिलीप गांधी कुटुंबीयांचे सांत्वन

पंकजा मुंडे यांनी आज, शुक्रवारी स्व. गांधी यांच्या कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन केले.

नगर : भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांच्यासारखे प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व आता आपल्यात नसल्याचे मोठे दु:ख होत आहे. नगरमध्ये आल्यावर त्यांच्याकडून होणारे आदरातिथ्य कायम स्मरणात राहील. गेल्या ऑक्टोबरमध्ये दसरा मेळावा आटपून मी नगरमार्गे पुण्याला जाताना दिलीप गांधी यांची माझी शेवटची भेट झाली होती. आज ते नसले तरी मी गांधी परिवाराबरोबर कायम असणार आहे, अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांनी स्व. दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

पंकजा मुंडे यांनी आज, शुक्रवारी स्व. गांधी यांच्या कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन केले. श्रीमती सरोज गांधी, सुवेंद्र व देवेंद्र गांधी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. या वेळी स्व. गांधी यांच्या अनेक जुन्या घटना व कार्यक्रमांच्या आठवणींना श्रीमती मुंडे यांनी उजाळा दिला.

या वेळी खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह युवराज पोटे, दिलीप भालसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 1:11 am

Web Title: bjp pankaja munde consolation to dilip gandhi family akp 94
Next Stories
1 रुग्णवाहिका चालकांनी अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास कारवाई
2 पारनेरमधील नोंद नसलेल्या बाधितांची वाढ
3 विरारमधील आगीत १५ करोनाबाधितांचा होरपळून मृत्यू
Just Now!
X