भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. काही दिवसांत जनगणना होणार आहे. या जनगणनेत ओबीसींसह जातीय जनगणना व्हावी. म्हणजे सगळ्यांची ताकद किती आहे हे कळेल. तसंच त्यांचे प्रश्न कळतील, सरकारलाही त्यावर उपापयोजना करायला सोपं जाईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान रविवारी जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यात यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी असावा अशा घोषणा देण्यात आल्या. यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

धनंजय मुंडेंवरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन; म्हणाल्या…

Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
internal conflict in shiv sena dispute between mp rahul shewale and mla sada saravankar
दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेत वाद; विभागप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा

तुम्ही मुख्यमंत्री होणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मला यापासून थोडं दूर ठेवा. कोणत्याही पदावर नसताना मला ही चळवळ लढायची आहे. माझ्यासाठी हे महत्वाचं ध्येय आहे. मुंडे साहेबांची एक अपूर्ण लढाई मी लढणार आहे”. त्या औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

ओबीसीची जनगणना झाली पाहिजे
“ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवळी मांडली. प्रीतम मुंडे यांनीदेखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

म्हणून हिंदीत ट्विट केलं
“आता मी राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्यानने माझ्या अनेक भूमिका, मुद्दे राष्ट्रीय स्तरावर नोंदवण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे मी हिंदी भाषा वापरते, काल पहिल्यांदा वापरली नाही. जेव्हापासून मी राष्ट्रीय सचिव झाले तेव्हापासून बऱ्याच शुभेच्छा आणि मतं हिंदीत व्यक्त करत असते,” असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.

धनंजय मुंडेंवरील आरोपांवर सोडलं मौन
“तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करु शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो,” असं त्या म्हणाल्या.

“मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचं राजकीय भांडवलं केलं नसतं, आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.