03 December 2020

News Flash

“ओबीसी म्हणजे…”, फडणवीसांवर टीका करणाऱ्या खडसेंविरोधात भाजपा आक्रमक

"देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं"

सतत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंविरोधात भाजपा आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जेवढं काम केलं तेवढं कोणीही केलं नाही. फडणवीस सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही. भाजपाला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला तो उल्लेख करावा लागतो,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांकडून मानसिक छळामुळेच भाजपमधून बाहेर!
“भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला,” असं एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना सांगितलं. “गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे किती तरी नेते होते. त्यांच्यासोबत आजपर्यंत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारू शकत नाही,” असंही ते म्हणाले होते.

“मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यांवर टीका केली नाही. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नसल्याचे सांगितले आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत. माझी भाजपविषयी तक्रार नाही. केंद्रीय नेतृत्व किंवा प्रदेश कार्यकारिणीवर नाराज नाही. केवळ देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्यानेच भाजपला सोडचिठ्ठी देत आहे,” असं खडसे यांनी सांगितलं होतं.

“पक्षासाठी उभं आयुष्य घालवले. परंतु माझ्या चौकश्या फडणवीसांनी लावल्या. त्यामुळे बदनामी सहन करावी लागली. मला काय मिळाले वा नाही, याच्याशी घेणे-देणे नाही. माझ्या कथित स्वीय सहायकावर नऊ महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली. त्याची कबुली सभागृहात फडणवीसांनी दिली,” असं खडसे यांनी स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 9:49 am

Web Title: bjp pravin darekar on ncp eknath khadse devendra fadanvis sgy 87
Next Stories
1 बंधाऱ्यांच्या उघडय़ा दरवाजांतून टंचाईचा प्रवेश?
2 डहाणूत सिमेंट कारखाना
3 वसई-विरारमध्ये ओल्यासोबत सुकेही जाते..
Just Now!
X