X
X

उर्मिला मातोंडकरच्या शिवसेना प्रवेशावरुन प्रितम मुंडेंचा टोला, म्हणाल्या….

"त्यांचं नशीब बदलणार असेल तर..."

बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीची नव्याने सुरुवात करणार आहे. दरम्यान उर्मिला मातोंडकरच्या शिवेसना प्रवेशावरुन भाजपा खासदार प्रितम मुंडे यांनी टोला लगावला आहे. उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

“माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला काँग्रेस पक्षाकडून त्यांनी नशीब आजमावून पाहिलं. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचं आणि शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहे,” असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे.

उर्मिला मातोंडकरच्या शिवसेना प्रवेशासंबंधी संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले…

“कोणत्याच पातळीवर सरकार चांगलं काम करताना दिसत नाही. त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. लवकरच आपल्या कर्माने जिथून आलेत तिथे परत जातील. महाराष्ट्रात चांगले दिवस परत यायचे असतील तर लवकरच भाजपा पुन्हा सत्तास्थानी आलेली दिसेल,” असा विश्वासही प्रीतम मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहेत.

21
READ IN APP
X