भाजपा नेते रावसाहेब दानवे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून रावसाहेब दानवे यांनी मात्र यामागे कोणतंही राजकीय कारण नव्हतं असं सांगितलं आहे. साखर आणि कांदा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली असं त्यांनी सांगितलं असून संजय राऊत यांच्यासोबत करोनावर चर्चा झाल्याचा खुलासा केला.

एबीपी माझाशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, “राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कारखान्यांचे अकाऊंट एनपीएमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत हे कारखाने सुरु करण्यासाठी बँका पैसे उपलब्ध करुन देण्यास तयार नाहीत. ऊसाचं पीक यावर्षी मोठ्या प्रमाणात आलं आहे. पुढच्या काळात शेतकरी अडचणीत येऊ नये. त्याचा संपूर्ण ऊस गाळला जावा यासाठी बँकांशी काय चर्चा करता येईल? राज्य सरकारने काय केलं पाहिजे? केंद्र सरकारच्या नेत्यांना भेटून काही करता येईल का? या विषयावर माझी आणि पवारांची चर्चा झाली”.

Who Ask Question to Sharad Pawar?
“अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
CJI DY Chandrachud
“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा
anna hazare arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा माणूस कधी…”

“याशिवाय कांदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष आम्ही पाहिला. त्यांना न्याय दिला पाहिजे. कांदा निर्यात बंद असल्याने भाव पडतील शेतकरी सांगत आहेत. त्यासाठी काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं पाहिजे अशी चर्चा झाली,” असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. मोदींची वेळ मागितली असून त्यानंतर भेटीचं स्वरुप ठरवलं जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“शरद पवार राज्यातील ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहेत. मंत्री असलो तरी सभागृहात, राज्यात गेली २५ वर्ष आम्ही एकत्र काम करत आहोत. त्यामुळे विचारांची देवाण घेवणा होते. काही अडचण आल्यास चर्चा करतो. साखर कारखान्यांची समस्या आल्यानंतर शरद पवारांनी अनेकदा मला बोलावलं आहे. या महिन्यात मला तीन फोन आले. साखरेचे प्रश्न निर्माण झाले आहेत चर्चा करुयात असं त्यांनी सांगितलं. यासाठीच मी गेलो होतो,” असा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर बोलताना रावसाहेब दानवेंनी म्हटलं की, “दारात उभं राहिल्यावर दिसतो एवढी आमची घऱं जवळ आहेत. यावेळी आपण चहा घ्यायला या असं बोलत असतो. करोना सोडून कोणत्याही विषयावर आमच्यात चर्चा झाली नाही”.