News Flash

मुखेडची जागा भाजपने राखली

मुखेड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपली जागा कायम राखण्यात भाजपला यश आले. पक्षाचे उमेदवार डॉ. तुषार गोविंवदराव राठोड यांनी काँग्रेसचे उमेदवार हणमंतराव बेटमोगरेकर यांचा पराभव करून

| February 17, 2015 01:10 am

मुखेड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपली जागा कायम राखण्यात भाजपला यश आले. पक्षाचे उमेदवार डॉ. तुषार गोविंवदराव राठोड यांनी काँग्रेसचे उमेदवार हणमंतराव बेटमोगरेकर यांचा पराभव करून राजकीय पदार्पणातच विधानसभा गाठली.
गेल्या निवडणुकीत येथे भाजपचे गोिवद राठोड मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले; पण आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राठोड यांनी १ लाख ३९१ मते घेत प्रतिस्पर्धी बेटमोगरेकर यांचा ४७ हजार २४८ मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला समर्थन दिले, तर काँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीने पािठबा दिल्यामुळे निवडणुकीतील एकूण सात उमेदवारांपकी खरी लढत राठोड-बेटमोगरेकर यांच्यातच झाली. गेल्या वेळी मतदारांनी बेटमोगरेकर बंधूंवरील राग व्यक्त करून गोिवद राठोड यांच्या पारडय़ात मोठा विजय टाकला. आता पुन्हा त्याच मतदारांना सामोरे गेलेल्या बेटमोगरेकर यांच्या मतांमध्ये थोडी वाढ झाली; पण मतदारांची सहानुभूती राठोड परिवाराच्या बाजूने झुकली.
डॉ. तुषार हे राठोड परिवारातील सर्वात धाकटे. गत वर्षी त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकीय पाऊल टाकले. निवडणुकीच्या राजकारणात नवखे असतानाही त्यांनी प्राप्त केलेला विजय उल्लेखनीय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केली. मुखेडमध्ये पुन्हा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस गोटातील वातावरण सुन्न होते. हा हणमंतरावांचा नव्हे तर खासदार अशोक चव्हाण यांचा पराभव होय, असे भाजपतर्फे गंगाधर जोशी यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 1:10 am

Web Title: bjp save assembly seat in mukhed
टॅग : Bjp,Nanded
Next Stories
1 कॉ. पानसरे यांच्यावरप्राणघातक हल्ला
2 सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरूच
3 कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा मान्यवरांकडून निषेध
Just Now!
X