News Flash

‘अरे लाजा कशा वाटत नाही’, नवाब मलिक भाजपावर संतापले

'शरद पवार आणि पक्षाचे नेते दुष्काळी भागात फिरत असताना प्रशासन कामाला लागल्याने आता यांना जाग आली आहे'

नवाब मलिक

दुष्काळात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे आणि भाजपा विधानसभेची तयारी राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप करत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी संताप व्यक्त करत अरे लाजा कशा वाटत नाही अशा शब्दात भाजपाचा समाचार घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपाच्या कारभारावर जोरदार टीका केली.

यांनी कामे करायची नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेते दुष्काळी भागात फिरत असताना प्रशासन कामाला लागल्याने आता यांना जाग आली आहे, त्यामुळे टिका केली जात आहे. परंतु तुम्हाला तुमच्या कर्माची फळे जनताच देणार आहे हे लक्षात ठेवा असेही खडे बोल नवाब मलिक यांनी भाजपाला सुनावले.

महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचा अंदाज ८ महिन्यापुर्वी आला होता. पाऊस कमी पडल्यानंतर दुष्काळ असणार याचा सरकारला अंदाज आल्यानंतरही ते दुष्काळ जाहीर करत नव्हते. शेवटी आम्ही आंदोलने सुरु केल्यावर सरकारने दुष्काळ जाहीर केला. परंतु ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली पाहिजे होती. उपाययोजना केली पाहिजे होती ती केली नाही. लोकांना वार्‍यावर सोडण्याचे काम सरकारच्या माध्यामातून झाले. निवडणुकीचा आश्रय घेवून हे सरकार थंड बसले होते. शरद पवार यांनी दौरा सुरु केल्यानंतर निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहिता शिथील करा अशी मागणी करत आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कुठेही आचारसंहितेचा अडथळा येत नाही ही सत्य परिस्थिती आहे. दुष्काळ त्यांनी गंभीरतेने घेतला नाही. पाणीटंचाई, चारा टंचाई, बागायतदार मोठया प्रमाणात अडचणीत आहेत.परंतु सरकारकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

आचारसंहिता शिथील केल्यानंतर सरकारची जबाबदारी होती की मुख्यमंत्री, त्यांचे मंत्री यांनी आढावा घेवून प्रत्येक भागात गेले पाहिजे होते परंतु हे जात नाहीत लोकांना हे घाबरलेले आहेत. कारण यांनी कामे केली नाहीत. सिंचनाची ज्या पद्धतीने घोषणा केली त्या पद्धतीने या सरकारने चार वर्षात ४० हजार कोटीची कामे वाढवून दिली तरीसुद्धा कामे होत नाहीत. जलयुक्त शिवार योजनेमध्ये श्रमदान करुन बरीच कामे झाली आहेत. परंतु सरकारच्या बजेटमधून जी कामे त्यांनी केली. त्याचा कुठलाही फायदा झालेला नाही. जलयुक्त शिवार योजना ही भाजपा कार्यकर्ता पालनपोषण योजना होती. भाजपचे कार्यकर्ते यावर जगत होते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

जलयुक्त शिवार योजनेतून पाण्याची पातळी वाढली नाही. कामे नीट झाली नाहीत. यातून महाराष्ट्राला फायदा झालेला नाही. पाण्याचे तज्ज्ञही पाण्याची पातळी वाढली नसल्याचे सांगत आहेत. साडेचार वर्षांत या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली नाहीत. राज्यात दुष्काळ असून पैसे कसे वाचतील आणि गावं सोडून लोकं कशी जातील आणि मतदान विरोधात होणार नाही याची काळजीतून दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष या सरकारने केले आणि आज लोकं अडचणीत आले आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 8:12 pm

Web Title: bjp sholud feel ashamed while criticising ncp says nawab malik
Next Stories
1 ‘ईडी’ दणका, नागपूरमध्ये ४८३ कोटींचा मॉल जप्त
2 वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला आठवडभराची मुदतवाढ
3 कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
Just Now!
X