News Flash

“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”

"चंद्रकांत पाटील यांच्या निष्ठांबाबत रोहित पवारांनी न बोललेलंच बरं"

Rohit Pawar Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्या पुन्हा एकदा शाब्दिक सुरू झाल्याच पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. राोहित पवारांना भाजपानं प्रत्युतर दिलं असून टीका करताना शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

सरकार स्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाऊ, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून रोहित पवारांनी पाटील यांना टोला लगावला होता. आता रोहित पवारांवर भाजपाचे आमदार राम कदम यांनी टीका केली असून, शरद पवारांनाही लक्ष्य केलं आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदरणीय चंद्रकांत पाटील यांच्या निष्ठांबाबत रोहित पवारांनी न बोललेलंच बरं. महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्यावा. त्यांनी मुळात निष्ठेविषयी बोलूच नये. शिवाय जे स्वतः पुण्यातून विधान परिषद मागायला भाजपा नेत्यांच्या पायऱ्या झिजवत होते त्यांनी चंद्रकांत पाटलांवर आक्षेप घ्यावा? आता तरी खरच राजकारण थांबवा. जनतेला अजून पाच पैश्याची सुद्धा मदत केली नाहीं त्यावर बोला,” अशी टीका राम कदम यांनी केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले होते?

“आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:18 pm

Web Title: bjp slam rohit pawar for statment on chandrakant patil bmh 90
Next Stories
1 Maharashtra SSC results 2020 : २४२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी
2 करोनाबाधित शेतकऱ्याला गावकऱ्यांची मदत
3 maharashtra ssc result 2020 : सिंधुदुर्गचा निकाल ९८.९३ टक्के
Just Now!
X