करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदा देखील राज्यभरातील वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता आलेले नाही. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज उद्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक पंढरपूरकडे रवाना झाले. दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पंढरपूरच्या दिशेने जाताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी तो टीपला. या पार्श्वभूमीवर व विविध मुद्द्यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्र्यांवर काव्यात्मक टीका केली आहे.

“जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम…एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला… वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…” अशा शब्दांमध्ये केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

या ट्विटमध्ये केशव उपाध्ये यांनी पावसामुळे मुंबई जलमय झाल्यावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत न झाल्याने स्वप्निल लोणकर या तरूणाने केलेल्या आत्महत्येवरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. जनतेचं जगणं कठीण होत असताना मुख्यमंत्री मात्र घरातूनच काम करत असल्याचं केशव उपाध्ये म्हणत आहेत.