News Flash

“शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार समजताच शांत बसले”

चंद्रकांत पाटलांची शेट्टींवर टीका

राज्यात दुधाचे दर घसल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या टीकास्त्र सोडलं आहे. “दुध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याची तयार दर्शवणारे राजू शेट्टी कधी आंदोलन करणार आहेत, हे आम्हाला पाहायचं आहे. शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेणार आज आमदारकी मिळणार असल्याचं समजताच शांत बसले आहेत” असा टोला पाटील यांनी शेट्टी यांना लगावला आहे.

“राज्यात दुधाला सध्या २२ रुपये इतका दर मिळत आहे. २२ रुपये इतक्या साध्या रकमेतून मुलभूत खर्चही भागवणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाउन होण्याआधी दुधाला साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. मात्र तरीही आता कोणीही कुठेही निषेध करताना दिसत नाही. दुधासाठी आंदोलन करणारे राजू शेट्टी आता अगदी शांत आहे. दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याचं तुम्ही एकदा म्हटलं होतं. मात्र आता त्यांच्याकडून या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य ऐकायला मिळत नाही. राजू शेट्टी, कधी आंदोलन करणार आहेत. हे आम्हाला पाहायचं आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आणखी वाचा- “भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात, नावं कळली तर राज्यात भूकंप होईल”; यशोमती ठाकूर यांचा गौप्यस्फोट

“सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या दुधाच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आली नाही, मग शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे दूध काय वेगळ्या पद्धतीचं आहे का? त्यात एवढी फारकत का? राजू शेट्टी यांना आणखी एक गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे युरिया देखील कुठेच मिळत नाहीये. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्त असून, संकटात सापडले आहेत,” असं पाटील म्हणाले.

आणखी वाचा- पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारकडे रोखठोख मागणी

आणखी वाचा- “महाविकास आघाडीचे सरकार करोनाच्या तिरडीवर झोपलेले”

“बांधावर जाऊन गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आता घरात बसून फेसबुक लाईव्ह करत आहेत. राजू शेट्टीजी तुम्हाला आमदारकी मिळणार असल्याचे कळले. मात्र, आमदार झाल्यानंतरच तुम्ही शेतकऱ्यांसाठी पुढाकार घ्याल, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल आणि तोपर्यंत अगदी गप्प राहाल असं वाटत आहे,” असा टोला पाटील यांनी शेट्टी यांना लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 1:45 pm

Web Title: bjp state president chandrakant patil slam to raju shetti over milk price bmh 90
Next Stories
1 “स्वतःच्या मुलाला तरी परीक्षेला पाठवू का?, यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावं”
2 औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर
3 आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख; त्वरीत कारवाईची मागणी
Just Now!
X